Home कृषी माजी आ.कोकरे‎:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना‎ मदत द्यावी

माजी आ.कोकरे‎:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना‎ मदत द्यावी

213
0

खामगाव‎:मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात‎ अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.‎ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी‎ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.‎ अशातच १८ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजताचे‎ सुमारास तालुक्यातील गणेशपूर परिसरात‎ गारपीटसह पाऊस झाला. यामुळे गव्हासह‎ इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले असून‎ शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसान‎ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी‎ आ.नानाभाऊ कोकरे यांनी एका प्रसिद्धी‎ पत्रकाद्वारे केली आहे.‎जिल्ह्यावर मागील काही दिवसांपासून‎ अवकाळी पावसाचे सावट असताना‎ तालुक्यात १७ मार्च रोजी रात्री दरम्यान‎ वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह‎ जोरदार पाऊस झाला. यामध्ये खामगाव‎ तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे‎ नुकसान झाले आहे. दरम्यान, दि.१८ रोजी‎ सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतांना‎ दुपारी अचानक गारपीटसह पाऊस झाला.‎ यामुळे नदीला सुध्दा पूर आला होता. त्यामुळे‎ महसूल प्रशासनाने तातडीने सर्व्हे करून‎ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी‎ मागणी माजी आ.नानाभाऊ कोकरे यांनी‎ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here