Home मनोरंजन परिणिती आणि राघव यांच्या नात्याला दुजोरा,गायक हार्डी संधूनी दिल्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा

परिणिती आणि राघव यांच्या नात्याला दुजोरा,गायक हार्डी संधूनी दिल्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा

242
0

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. तिचं नाव आप पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत जोडलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी मुंबईत एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या.त्यानंतर आपच्या नेत्याकडून दोघांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळं परिणिती आणि राघव यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. पण अद्यापही दोघांनी यावर भाष्य केलं नाहीये.
परिणिती आणि राघव यांना नुकतंच दिल्ली विमानतळावरही स्पॉट करण्यात आलं होतं. पण दोघांनी याबद्दल अद्यापही गप्प राहणं पसंत केलं आहे. आता आणखी एका सेलिब्रिटीनं परिणिती आणि राघव यांच्या नात्यावर भाष्य करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गायक हार्डी संधू यानं परिणिती आणि राघव यांच्या नात्याचं सिक्रेट उघड केलं आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्डी संधू म्हणाला की, ‘मी खूप खूष आहे, की अखेर हे होतंय. मी परिणितीला शुभेच्छा देतोय. मी तिला फोन करून नवीन आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत, असंही त्यानं सांगितलं.मुलाखतीत हार्डी संधूनं हे पण सांगितलं की, ‘कोड नेम- तिरंगा’ या चित्रपटात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हा आमच्या नात्याबद्दलही चर्चा रंगल्या होत्या.पुढं हार्डी संधू म्हणाला की, या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान जेव्हा आम्ही लग्नाबद्दल बोलायचो तेव्हा म्हणायची की, योग्य मुलगा मिळाली की, लगेच लग्न करेन.दरम्यान, परिणिती आणि राघव यांच्याबद्दल चर्चा सुरू असतानाच आपच्या खासदारानं एक ट्विट केलं आणि चर्चेला हवा मिळाली.आप खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करत परिणिती आणि राघव यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत लिहिलं होतं की,’मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं मनापासून अभिनंदन करतो. दोघांनाही प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या तुला हार्दिक शुभेच्छा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here