Home महाराष्ट्र अभिनेत्री पायल घोषने केला रिपाईत प्रवेश

अभिनेत्री पायल घोषने केला रिपाईत प्रवेश

91
0

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे.

Payal Ghosh Enters Politics to Ramdas Athawale's Join Republic Party of India

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोष ने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलचा पक्षप्रवेश झाला. पायलसोबतच तिचे वकीलही रिपाइंमध्ये प्रवेश करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पायल घोषकडे रिपाईच्या महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद सोपावलं जाऊ शकतं.

पायलच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘कायद्यानुसार पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पायल घोषसोबत आहोत. याप्रकरणी मला पश्चिम बंगालमधूनही फोन आले होते. पायल पश्चिम बंगालची आहे. तुम्ही मुंबईत राहता. तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असं मला सांगण्यात आलं. मी सांगितलं त्यांना की, मला हे सगळं सांगण्याची गरज नाही. मला सगळं माहिती आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही पायल घोषला पाठिंबा दिला. तसेच अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करण्यात यावी हिच आमची मागणी आहे.’

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘यादरम्यान जेव्हा पायलशी आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही रिपाइं नेहमीच अन्याय होणाऱ्यांसाठी आवाज उठवणारा पक्ष आहे, असं सांगितलं. तसेच जर तुम्ही आरपीआयमध्ये आलात तर आमच्या पक्षाला एक चांगला चेहरा मिळेल. त्यानंतर पायलनेही पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आज त्यांचा पक्षप्रवेश केला जात आहे.’

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोषकडून लैंगिक शोषणाचे आरोप

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अचानक बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना लैंगिक शोषणाचे आरोप केले. अनेकांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्याशी बोलताना त्याने विशिष्ट मागणी केली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, तू इतकी शाय का आहेस, मी जवळपास 200 मुलींसोबत ‘वेळ’ घालवला आहे. आणि त्या सर्वांसाठीच तो चांगला वेळ होता. बॉलिवूड अभिनेत्रीने हे स्टेटमेंट दिल्यावर इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती.


रेल्वे सुरु पण प्रवाश्यांकडून संमिश्र प्रतिसाद – मराठवाडा साठी टीव्ही रिपोर्ट

कोरोना काळात वाढलेली स्थूलता, मानसिक स्वाथ्य कसे जपावे – डॉ रेणुका राजे (आरोग्यतज्ज्ञ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here