Home बीड नरभक्षक बिबट्याची आष्टीतालुक्यातून कर्माळ्याकडे कुच

नरभक्षक बिबट्याची आष्टीतालुक्यातून कर्माळ्याकडे कुच

फुंदेवाडीत शिवारातील हल्ल्या एक शेतकरी ठार

452
0

मराठवाडा साथी न्युज

आष्टी: आष्टी तालुक्यात तीन बळी घेण्याऱ्या नरभक्षक बिबट्याने गुरूवारी दि. तीन करमाळा तालुक्यात मोर्चा वळवला आहे. फुंदेवाडी (ता. करमाळा) गुरूवारी (दि. तीन) येथे शेतात काम करणाऱ्या एक शेतकऱ्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे. आष्टी तालुक्यात तपास यंत्रणेला दोन दिवसापासून नरभक्षक बिबट्याचा माग सापडत नसल्याने तज्ञांकडून हा आंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यात मागील पंधरवाड्यापासून दहशत पसरविणाऱ्या नरभक्षक बिबट्याने सुरडी, किन्ही, पारगाव जोगेश्वर येथील तीन दोन नागरीकांसह एक बालकाचा बळी घेतला. पारगाव जोगेश्वरी येथील दि. 29 नोव्हेंबरच्या हल्ल्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पारगाव शिवारात नरभक्षक बिबट्या काही नागरीकांना दिसून आला. तसेच तपास यंत्रणेला त्याच्या पायाचे ठसेही दिसून आले होते. त्यानंतर सोमवारी दि. एक सोलेवाडी येथील एका वृद्ध शेतकऱ्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील शेतकऱ्याच्या मुलाने प्रसंगावधान राखून मोठ्या शिताफीने वडीलांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले. नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी राज्यभरातून वनविभागाच्या विविध पथकांसह शार्प शुटर पथकाने तालुक्याचे जंग जंग पछाडले. या शिवाय अद्ययावत यंत्रणेच्या साह्याने नरभक्षक बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण रब्बीचे उभे पिक आणि बिबट्यास पकडण्यासाठी अवश्यक परिसरा अभावी अथक प्रयत्ना नंतरही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. त्यामुळे इतर प्राण्यांना भक्ष बनविण्या ऐवजी केवळ माणसांवरच हल्ले चढवणाऱ्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने नागरीक धास्तावले होते. बिबट्या जागा सोडल्या नंतर किमान 15 ते 16 किलो मिटरचा प्रवास करतो. पारगाव जोगेश्वरी येथील हल्ल्या नंतर गेल्या दोन दिवसात नरभक्षक बिबट्याचा तालुक्यात माग लागत नसल्याने नरभक्षक बिबट्याने पारगाव जोगेश्वरी परिसरची जागा सोडल्याचा अंदाज तपास यंत्रणेकडून लावण्यात आला होता. त्यान नुसार तपास यंत्रणेकडून राबवण्यात आलेल्या उपाय योजनांद्वारे तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा माग लागत नसल्याची चर्चा सुरु असतानाच गुरुवारी (दि.तीन) फुंदेवाडी (ता. करमाळा) येथील शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला चढवल्याची माहिती समोर आली. दरम्यान , या हल्ल्यात शेतकऱ्यास आपले प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच आष्टी तालुक्यातील तपास यंत्रणेतील अधिकारी, शार्प सुटरच्या ताफ्यसाह आमदार सुरेश धस रात्री 11:00 च्या दरम्यान फुंदेवाडी येथील घटनास्थळावर पोहचले. तालुक्यात तीन बळी घेवून दहशत पसरविणाऱ्या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात फुंदेवाडी येथे ठार झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन करत स्थानिक प्रशासनाला खबरदारीच्या सुचना दिल्या.


नरभक्षक बिबट्याचा प्रवास मार्ग : वन विभागाच्या महितीनुसार या बिबट्याने जालना जिल्ह्यातील एक महिला ठार केल्या नंतर पैठण तालुक्यातील अपेगाव येथे पितापुत्रास ठार केले होते. त्यानंतर त्याने हा भाग सोडला तो पाथर्डी तालुक्यातील भगवानगड तांडा परिसरात दाखल झाला येथे एका महिलेवर हल्ला केला. त्यानंतर शिरूर तालुक्यातील जटवड येथे हल्ला करुन आष्टी तालुक्यातील सुरुडी शिवार गाठला. येथे नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्याने किन्ही परिसर गाठला . येथे नरभक्षक बिबट्याने स्वराज या बालकावर हल्ला केला. त्यानंतर नगर जामखेड हायवे ओलांडून त्याने मंगरूळ शिवारात प्रवेश केला. येथे एका महिलेवर हल्ला केल्यानंतर नरभक्षक बिबट्याने पारगाव जोगेश्वरी शिवार गाठला. पारगाव जोगेश्वरी येथे एकाच दिवसात दोन महिलांवर हल्ले केले यामध्ये एका सुरेखा बळे यांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पारगाव जोगेश्वारी येथील नागरीकांनी तपास यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून गस्त घातल्याने नरभक्षक बिबट्याने पारगाव जोगेश्वरी परिसरत सोडून गुरुवारी (दि. तीन) फुंदेवाडी (ता. करमाळा) शिवारात दाखल होत एका शेतकऱ्यास ठार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here