Home इतर प्रेमसंबंधात अडथळा;पत्नीकडून पतीची हत्या…!

प्रेमसंबंधात अडथळा;पत्नीकडून पतीची हत्या…!

116
0

मराठवाडा साथी न्यूज

नागौर : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात झालेल्या तरुणाच्या हत्येबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.या तरुणाची हत्या दुसरे कोणी नाही तर त्याच्या स्वतःच्या बायकोनेच तिचा प्रियकर असलेल्या भाच्याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंडवामध्ये राहत असलेल्या सुरेशचा मृतदेह त्याच्या घराबाहेरील पलंगावर मिळाला होता.त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होतीतपासानंतर त्यांनी मृत सुरेशची पत्नी किरण आणि त्याचा भाचा शंभूदास यांना अटक केली.या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध असून यामध्ये सुरेशचा अडथळा असल्यामुळे हत्याकेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,पोलिसांना घरातल्याच व्यक्तीचा या घटनेमध्ये सहभाग असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता सुरेशच्या पत्नीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळए त्यांचा संशय खरा ठरला आणि शेवटी आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here