Home Uncategorized “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही.

“मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही.

531
0


मराठवाडसाथी न्यूज
मुंबई : योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. यावरून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथा यांना इशारा दिल्याचे दिसत आहे. “मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे.
“मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तर, चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा आदित्यनाथ यांचा डाव असल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्षेप घेतला असतानाच, कोणाला जोरजबरदस्तीने राज्यातून उद्योगांना जाऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या पार्श्वभूमीवर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here