Home अर्थकारण आधार लिंक नसेल तर मिळणार नाही रेशन ….

आधार लिंक नसेल तर मिळणार नाही रेशन ….

92
0

मुंबई : रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार अशी माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप तीन लाखांहून अधिक लाभार्थीचं आधार लिंकीग होणे बाकी आहे.

रेशन दुकानावर आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. आधार कार्डावरुन तुमचं रेशन आधारसोबत लिंक केलं जाणार आहे. यासाठी फिंगर प्रिंट देखील स्कॅन केला जाणार आहे. कुटुंबातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबर देखील द्यावा लागणार आहे.बोगस रेशन ओळखले जावेत यासाठी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. ३१ जानेवारीपर्यंत आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. आधार लिंक न केल्यास १ फेब्रवारीनंतर रेशन दिले जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here