Home इतर आता ऑनलाईन मिळणार ‘माहिती’…!

आता ऑनलाईन मिळणार ‘माहिती’…!

361
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे.यापुढे आता माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा अर्ज देण्यासाठी किंवा लिखित उत्तरे घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही.कारण पालिका लवकरच ही सेवा ऑनलाइन सुरू करणार आहे.त्यामुळे घरी बसून सुद्धा ही माहिती मिळू शकणार आहे.त्यामुळे आता लाखो मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

माहिती अधिकार कायदा २००५ नुसार संबंधित माहिती एक महिन्यात देण्याचा कायदा असला, तरी अनेकदा दिलेल्या मुदतीत माहिती मिळतेच असे नाही.त्यामुळे नागरिकांना जलद वेळेत माहिती मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑनलाइन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते करीत आहेत.मुंबई महपालिका ऑनलाइन सेवा कधी सुरू करणार, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी माहिती मागितली असता पालिकेने उत्तरात म्हंटले आहे की,’ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची पूर्तता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पूर्ण केली असून, प्रमुख कर्मचारी अधिकारी विभागाने ही यंत्रणा कधी सुरू करायची याबाबत सूचित केलेले नाही,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान,यासंदर्भात पालिकेचे कर्मचारी अधिकारी विभागाच्या प्रमुख संध्या व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की,काही तांत्रिक बाबींमुळे सेवा अद्याप ऑनलाइन सुरू करता आलेली नाही.या यंत्रणेसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काही वाॅर्डात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाईल. त्यानंतर मुंबईतील सर्वच वाॅर्डात ही सेवा सुरू करण्यात येईल. लवकरच ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे,असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here