Home नाशिक नाशिकमध्ये भाजपाच्या दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकमध्ये भाजपाच्या दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

334
0

भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : भाजपाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले.’वसंत गीते आणि सुनिल बागुल हे इथं माझ्यासोबत आले आहे, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. आता दोन्ही नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकचा बालेकिल्ला आता आणखी भक्कम केला जाणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शोभा मगर, प्रकाश दायमा हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर इतर अनेकांनीही शिवसेनेशी संपर्क साधला असून, महापालिकेतील अनेक महत्वाच्या नेत्यांचाही यात समावेश असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसंच ‘पुढचा महापौर हा शिवसेनेचा असणार आहे’, असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here