Home आरोग्य अदर पुनावाला यांनी घेतली “कोरोना लस “

अदर पुनावाला यांनी घेतली “कोरोना लस “

403
0

पुणे : आजपासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच आता कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लस घेऊन या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग घेतला आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, “जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो.”अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here