Home राजकीय मुस्लिम बाबराचे…

मुस्लिम बाबराचे…

70
0


मराठवाडा साथी न्यूज
सिंधुदुर्ग : भारतातील मुस्लिम हे काही बाबराचे वंशज नाहीत. कुणी तरी आक्रमण केले आणि ते मुस्लिम झाले. हे मुस्लिम आपल्या कोकणातील गोडसे, गाडगीळ किंवा दाते होते, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवलीतील एका सभेत केला आहे.भाजपच्या वतीने कणकवली येथे कृषी कायदे समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबर हा काही भारतातील मुस्लिमांचा वंशज नव्हता, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना समजून सांगितले. अरे बाबा तुम्ही इथलेच. आपले कोकणातील स्थानिक गोडसे, गाडगीळ किंवा दाते. कुणी तरी आक्रमण केले आणि ते मुस्लिम झाले, असे चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here