Home Uncategorized पहिल्या सत्रात ७२०० जणांनी दिली परीक्षा

पहिल्या सत्रात ७२०० जणांनी दिली परीक्षा

405
0

औरंगाबाद/ मराठवडा साथी न्यूज : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तार अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि.९ सप्टेंबरपासून सुरु झाल्या. चार जिल्हयातील ३३० केंद्रावर पहिल्या दिवशी सकाळच्या सत्राला एकुण ११५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीरित्या दिली. तर उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली.
ऑनलाईन परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचण आली तर त्या विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती. येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत ही परीक्षा होत आहे. या सर्व केंद्रावर कोविड च्या पाश्र्वभुमीवर ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ ठेऊन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. परीक्षेसाठी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.प्रताप कलावंत यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here