Home इतर संपत्तीच्या वादामुळे नातं विसरून केली मोठ्या भावाची हत्या…!

संपत्तीच्या वादामुळे नातं विसरून केली मोठ्या भावाची हत्या…!

69
0

मराठवाडा साथी न्यूज

कोटा : संपत्तीच्या वादामुळे एकमेकांचे जीव घेतले जातात.मात्र,त्याहूनही धक्कादायक घटना उघड झाली आहे.जमिनीच्या वादामुळे लहान भावाने नातं विसरुन चक्क मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थान मधील कोटा जिल्ह्यात घडली आहे.या प्रकरणात लहान भावाने ५० हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या केली.फक्त एव्हढेच नाही तर प्रेत विहिरीत फेकून दिले.या प्रकरणाची पोलिसांनी ७ दिवस तपासणी केली त्यानंतर आरोपी लहान भावासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,’३१ डिसेंबरच्या रात्री कमल गुर्जर या आरोपीने त्याच्या मित्राच्या(विष्णू कुमार)मदतीने मोठा भाऊ सत्यनारायण गुर्जर यांच्या हत्येचा कट रचला. या दोघांनी झालावाड जिल्ह्यातल्या ललन उर्फ निखिल आणि दीपक या सुपारी किलरला सांगून सत्यनारायण यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीमध्ये फेकून दिला.

दरम्यान,’कमल याने मित्र विष्णूच्या मदतीने निखील आणि दीपक या सुपारी किलरशी संपर्क साधला त्यानंतर ५० हजारांवर त्यांच्यातील ‘सौदा’ निश्चित झाला’, अशी माहिती कमलने पोलिसांना सांगितली.पोलिसांनी या प्रकरणात कमल, विष्णू कुमार, निखील आणि दीपक या चौघांना अटक केली असून आरोपी अद्यापही फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here