Home वाचककट्टा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

533
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरष म्हणून ओळखले जातात. डॉ.आंबेडकर यांची जयंती काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात भीम जयंतीचा तयारी सुरु करण्यात आली आहे. आंबेडकरांची जयंती करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांता जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येतं. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. तर त्यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाला.

आंबेडकरांबाबतची महत्वाची माहीती पुढीलप्रमाणे

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे १४ वे आणि शेवटचे अपत्य होते.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव आंबवडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शाळेच्या नोंदीमध्ये आंबेडकर हे आडनाव दिले.
३) परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (PHD) पदवी प्राप्त करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते.
४) आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्ससोबत जोडलेला आहे.
५) भारतीय तिरंग्यात “अशोक चक्र” ला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते.
६) नोबेल पारितोषिक विजेते प्रा. अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रात आंबेडकरांना आपले वडील मानायचे.
७) मध्य प्रदेश आणि बिहारच्या चांगल्या विकासासाठी बाबासाहेबांनी ५० च्या दशकात या राज्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता, परंतु २००० नंतरच मध्य प्रदेश आणि बिहारचे विभाजन करून छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती झाली.
८) बाबासाहेबांच्या खाजगी ग्रंथालय “राजगढ” मध्ये ५० हजारांपेक्षा जास्त पुस्तके आहेत आणि ती जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती.
९) आंबेडकरांनी हिलेले “वेटिंग फॉर अ व्हिसा” हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठाने २००४ मध्ये जगातील टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली आणि त्या यादीत पहिले नाव बाबासाहेबांचे होते.
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६४ विषयात पारंगत होते. त्यांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा ९ भाषांचे ज्ञान होते.
११) बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ८ वर्षांचे शिक्षण अवघ्या २ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण केले.
१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ८ लाख ५० हजार समर्थकांसह बौद्ध धर्मात घेतलेली दीक्षा जगातील ऐतिहासिक गोष्ट ठरली, कारण ते जगातील सर्वात मोठे धर्मांतर होते.
१३) “महंत वीर चंद्रमणी”, एक महान बौद्ध भिक्खू होते त्यांना बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून “डॉक्टर ऑल सायन्स” ही बहुमोल डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.
१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जगभरात सर्वाधिक गाणी आणि पुस्तके लिहिली गेली आहेत.
१५) पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव सत्याग्रही होते.
१६) काठमांडू, नेपाळ येथे १९५४ मध्ये झालेल्या “जागतिक बौद्ध परिषदेत” बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची सर्वोच्च पदवी “बोधिसत्व” बहाल केली होती.
१७) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तीन महापुरुषांना आपले “गुरू” मानले.
१८) बाबासाहेब मागासवर्गीयांचे पहिले वकील होते.
१९) बाबासाहेब आंबेडकरांनी “द प्रॉब्लेम ऑफ रुपया-इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन” या पुस्तकात नोटाबंदीबाबत अनेक सूचना दिल्या आहेत ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
२०) बंद डोळ्यांनी बुद्धाच्या मूर्ती आणि चित्रे जगात सर्वत्र दिसतात, परंतु बाबासाहेब, जे एक चांगले चित्रकार देखील होते, त्यांनी बुद्धाचे पहिले चित्र बनवले ज्यामध्ये बुद्धाचे डोळे उघडे आहेत.
२१) बाबासाहेब हयात असताना १९५० साली त्यांचा पहिला पुतळा बनवण्यात आला आणि हा पुतळा कोल्हापूर शहरात बसवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here