Home शहरं शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण करणार बंद…!

शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण करणार बंद…!

54
0

मराठवाडा साथी न्यूज

अहमदाबाद : जून महिन्यापासून शालेय शुल्क न भरलेल्या आणि लवकर शुल्क देण्यास तयार नसलेल्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय गुजरातमधील १५ हजार खाजगी शाळांच्या संघटनेने घेतला आहे.दरम्यान,गुजरात स्वयंअनुदानित शालेय व्यवस्थापन संघटनेचे उपाध्यक्ष जतिन भराड यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणाबाबत गंभीर असलेल्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घ्यावी. गेल्या सहा महिन्यांपासून शालेय शुल्क न देणाऱ्या आणि भविष्यातही न देणाऱ्या पालकांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय खाजगी शाळांनी घेतला आहे.

मात्र खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. शुल्क अदा करण्यासाठी शाळा पालकांना सक्ती करून शकत नाही. विशेष म्हणजे कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे लोकांना आर्थिक फटका बसलेला असताना अशी सक्ती करू शकत नाही. हा मुलांवर अन्याय आहे, असे संघटनेचे अध्यक्ष नरेश शहा यांनी म्हटले आहे.

अश्या प्रतिक्रिये नंतर जतिन भराड यांनी स्पष्ट केले की, शुल्क भरा म्हणून आम्ही पालकांना सांगत नाहीत. थकीत असलेल्या शुल्काबाबत ज्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे, अशा पालकांच्या मुलांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.मात्र,शुल्क न दिलेल्या किंवा भविष्यातही देण्याची तयारी नसलेल्या पालकांसाठी हा निर्णय लागू असेल. काही पालकांनी वर्षभराचे शुल्क भरणार नसल्याचे सांगितेले आहे. अशा पालकांसाठी हा निर्णय आहे असेही भराड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here