Home मनोरंजन अक्षय केळकरसोबतच्या नात्याबद्दल समृद्धी केळकर पहिल्यांदच स्पष्टचं बोलली.

अक्षय केळकरसोबतच्या नात्याबद्दल समृद्धी केळकर पहिल्यांदच स्पष्टचं बोलली.

248
0

मुंबई: स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली होती. या मालिकेने तिला घराघरात पोहचवले. समृद्धी अभिनयाच्याबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरबरोबर तिचे नाव जोडले जात आहे. यावर ती पहिल्यांदाच बोलली आहे.काही दिवसापूर्वी अक्षयची बहीण श्रद्धा केळकरचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्यात अक्षयचे खास मित्र उपस्थित होते. हा सोहळा अक्षय आणि त्याच्या बहिणीसाठी फारच अनोखा ठरला. याच लग्न सोहळ्यात अभिनेत्री समृद्धी केळकरने उपस्थित लावली होती. तेव्हापासून अक्षय आणि समृद्धीचं नाव जोडलं जात आहे व सोशल मीडियावर चर्चाना उधाण आलं . याबद्दल ती पहिल्यांदा एका मुलाखतीत स्पष्ट बोलली आहे.समृद्धीनं राजश्री मराठीच्या टुडेस स्पेशल या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा तिला अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मी पहिले आमच्यावरचे व्हिडिओ पाहून कोमात गेले होते, माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी, आपल्या सिनेसृष्टीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारले, त्यावर मी आता उत्तर देते तो माझा खूप चांगला मित्र आहे. जवळपास पाच वर्ष आम्ही मित्र आहोत. मी त्याची बहीण, बायको अशी कोणीच नाहीये.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.समृद्धी आणि अक्षयची नुकतीच ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आहे. समृद्धी एक उत्तम अभिनेत्री आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. समृद्धीने याआधी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या कार्यक्रमातुन समृद्धी आता एका नव्या रूपात आपल्या भेटीस येत असते. या कार्यक्रमात ती सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आपल्याला दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here