Home महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी, आजपासून निम्म्या तिकिट दरात महिलाना करता येणार एसटी बसमधून...

शासनाचा आदेश जारी, आजपासून निम्म्या तिकिट दरात महिलाना करता येणार एसटी बसमधून प्रवास

338
0

मुंबई:राज्यातील सर्व महिलांना आजपासून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५०% सवलत मिळणार आहे. राज्य अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत ही घोषणा केली होती. या आदेशाचा जीआर निघाला आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास ३० प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतींचे शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला देण्यात येते.राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ ते १००टक्क्यां पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती.तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा ९ मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही.उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट ५० टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीचा जीआर निघाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here