Home संस्कृती मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

130
0

कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 27 फेब्रुवार ला मराठी भाषा दिन साजरा करतो .कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले आहे.
आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासनाने हा निर्णय २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहेत . महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केले. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून “१ मे” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो . महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी ‘मराठी राजभाषा अधिनियम १९६४’ सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.१ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here