Home औरंगाबाद प्रेमसंबंधातून मॉन्टी सिंगचा खून झाल्याचा संशय!

प्रेमसंबंधातून मॉन्टी सिंगचा खून झाल्याचा संशय!

78
0

हत्येपूर्वी प्रेयसीला केली होती बेदम मारहाण, पोलिसांनी घेतले तिला ताब्यात
मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । प्रेमसंबंधातून मॉन्टी सिंगचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी असल्याने त्यांनी त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकजण फरारी झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येपुर्वी त्याने प्रेयसीला बेदम मारहाण केली होती, त्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांचा आहे.
मिटमिट्यातील पिस होम्सच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये मंटूश कुमार सिंग उर्फ मॉन्टी सिंग अनिल कुमार सिंग (३१) याचा बुधवारी खून झाला. सोमवारी रात्री मॉन्टी सिंगसोबत त्याची प्रेयसी फ्लॅटमध्ये मुक्कामी होती. त्यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यातून मॉन्टी सिंगने तिला जबर मारहाण केली होती. त्यामुळे तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला जखमही झाली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजेच मंगळवारी मॉन्टी सिंगने प्रेयसीला दुपारी तिच्या घरी नेऊन सोडले होते.
फ्लॅटची तिसरी चावी होती तिच्याकडे
त्याच दिवशी रात्री मुकुंदवाडी भागातील एका हॉटेलात मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तो मित्र विशाल दामोदर याच्याकडे फ्लॅटची चावी आणायला गेला होता. त्याच्याकडून फ्लॅटची चावी घेऊन गेल्यावर तो झोपी गेला. तो राहत असलेल्या फ्लॅटच्या तीन चाव्या आहेत. त्यापैकी एक चावी त्याच्या प्रेयसीकडेही होती. दुसरी विशाल दामोदर तर तिसरी एक चावी कार घेऊन गेलेल्या संघर्ष पगारे याच्याकडे होती. त्यामुळे पोलिसांनी तिसरी चावी शोधत तिला ताब्यात घेतले आहे.
तिच्यावरही आहे खूनाचा आरोप
मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मॉन्टी सिंग मित्रांच्या संपर्कात होता. पण त्यानंतर त्याची कोणाशीही भेट झाली नव्हती. त्याच्या फ्लॅटमध्ये गेलेला मारेकरी हा ओळखीचाच असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण अनैतिक संबंधातून घडल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्याच्या प्रेयसीच्या वैजापूर येथील पतीचा काही वर्षांपुर्वी मृत्यू झाला आहे. त्यावरुन तिच्या विरुद्ध पतीच्या नातेवाईकांनी न्यायालयात खूनाचा खटला दाखल केला असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये ती त्याच्या फ्लॅटवर
लॉकडाऊन काळात तीन महिने मॉन्टी सिंगची प्रेयसी त्याच्या फ्लॅटवरच होती. दारुचे व्यसन असल्याने ती मॉन्टी सिंग यांच्या फ्लॅटवर जात असे. मॉन्टी सिंग तिला खर्चासाठी पैसे पुरवायचा. मॉन्टी सिंगशिवाय तिचे आणखीही मित्र आहेत असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here