Home अर्थकारण RBI ने 5 सहकारी बँकांवर लावले निर्बंध;ग्राहकांना मोठा धक्का!

RBI ने 5 सहकारी बँकांवर लावले निर्बंध;ग्राहकांना मोठा धक्का!

632
0

मुंबई : आरबीइआय ने पुन्हा एकदा सहकारी बँकेवर निर्बंध लावले आहेत. 5 को ऑपरेटिव्ह बँकांवर हे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे काढताना अडचनीचा सामना करावा लागू शकतो.या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत. या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने कायम राहणार आहेत.कर्जदारांची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पाच सहकारी बँकांवर रोख रक्कम काढण्यासह अनेक निर्बंध लावले आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील. या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत.CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार या पाच बँकांना म्हणजे HCBL सहकारी बँक, लखनऊ, आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि कर्नाटकातील शिमशा सहकारी बँक नियामिथा, मद्दूर, मंड्या जिल्ह्यातील ग्राहक सध्याच्या संकटामुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत.उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात ,आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. संपत्ती ट्रान्सफर किंवा त्या संदर्भातील कामं करता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here