Home महाराष्ट्र कोकणात फुलले कमळ ,सेनेच्या वैभव नाईकांचा पराभव

कोकणात फुलले कमळ ,सेनेच्या वैभव नाईकांचा पराभव

432
0

मालवण, कुडाळ, कणकवली आणि सावर्डेमधील निकाल

कोकण : कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. मालवणमधील सहापैकी पाच ग्रामपंचायतींवर कमळ फुललं आहे. मलावणमधील हा पराभव शिवसेनेबरोबरच स्थानिक शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

मालवण कुडाळमध्ये कमळ :

मलावणमधील चिंदर, पेंडुर, कुंकवळे, मसदे आणि गोळवन या ग्रामपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तर आवडवली या एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. मलावणमध्ये शिवसेना आमदार वैभाव नाईक आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. अखेर मालवणमध्ये भाजपा हा मोठ्या फरकाने शिवसेनेवर भारी पडल्याचे चित्र निवडणुकीमधून स्पष्ट झालं आहेएकूण १५ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सहा तर भाजपचा नऊ ग्रामपंचायतीत मोठा विजय मिळाला आहे

कणकवलीमध्ये राणेंना धक्का

भाजपा आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय. कणकवली तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झालीय. कणकवली हा आमदार नितेश राणेंचा गड मानला जातो त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कणकवलीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेलं राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली.

सावर्डेमध्ये राष्ट्रवादी

रत्नागिरीमधील सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. सर्व नऊच्या नऊ जागांवर निकम पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. एकूण १७ ग्रामपंचायत उमेदवारांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या नऊही जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here