Home मनोरंजन मुंबई पोलिसांची कंगनाला दुसरी नोटीस

मुंबई पोलिसांची कंगनाला दुसरी नोटीस

7
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत पहिल्या नोटिशीनंतर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिली नव्हती. तिने घरात लग्नकार्य असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे आता अभिनेत्रीला दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र जर आता कंगना आणि तिची बहिण रंगोली १० तारखेला वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांनी कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली या दोघींना दुसरी नोटीस पाठवली आहे. यानुसार कंगनाला १० नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी एफआयआर दाखल आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी नोटीस धाडली होती. मुबंई पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी बोलावलं होतं. देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगना रणौतला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगिततं होतं. मात्र, यावेळी कंगना मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाला नोटीस धाडण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here