Home बीड कलाविष्कार प्रतिष्ठानमुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली!

कलाविष्कार प्रतिष्ठानमुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली!

666
0

गेवराई
गेवराई तालुका हा कलेचे माहेरघर आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदी क्षेत्रात अग्रेसर राहून कलाविष्कार प्रतिष्ठान दरवर्षी लोकाभिमुख कार्य करत असल्याने, गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळाली असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा तथा के महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.
गेवराईतील कलाविष्कार प्रतिष्ठान आयोजित बालग्राम परिवार, सहारा अनाथालयाच्या भव्य प्रांगणातील गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शोभा देवी महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ गिरीकाताई पंडित तर छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील, सहारा अनाथालयाचे संचालक संतोष गर्जे, भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, न प कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी पी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे, सचिव सौ आशाताई शिंदे, सदस्य नारायण झेंडेकर, एकनाथ लाड, शिवप्रसाद आडेळे, गणेश मिटकर, संतोष कोठेकर, सचिन पुणेकर, डॉ गणेश कोठेकर, प्रतीक कांबळे, रोहित चव्हाण, सौ सीता महासाहेब, सौ ज्योतीताई झेंडेकर, सौ स्वाती कोठेकर, सौ डॉ नितीशा कोठेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिप प्रज्वलनानंतर, प्रा सुनील मुंढे यांचे सुमधुर गितगायन व सहारा अनाथालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कलाविष्कार प्रतिष्ठानने जाहीर केलेल्या गेवराई भूषण पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी ऍड कमलाकर देशमुख यांना तर सहारा अनाथालयाच्या संचालिका सौ प्रितीताई संतोष गर्जे ( समाजरत्न ), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम, डॉ राजेंद्र आंधळे, डॉ रचनाताई शेळके/ मोटे ( आरोग्य रत्न ), पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा जोगदंड ( पोलीस रत्न ), पत्रकार सुभाष सुतार, संपादक सुनील पोपळे, विनोद नरसाळे ( पत्रकार रत्न ) तर जगन्नाथ जाधव, धर्मराज करपे ( शिक्षण रत्न ) यांना गेवराई रत्न पुरस्कार देवून तर अभय जोगदंड यांना महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुढे बोलताना डॉ दीपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, सामान्य माणसाला मायेची सावली देणाऱ्या सौ गिरीकाताई पंडित यांचे मोठे पाठबळ असल्याने, कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे व सौ आशाताई शिंदे या पतीपत्नीसह त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय व राजाश्रय मिळला आहे. नाव होण्यासाठी काम करणारे अनेक आहेत, परंतु काम केल्यानंतर नाव होणारे मोजकेच असतात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा पुरस्कार देवून गौरव करत, कलाविष्कार प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. उदात्त हेतूने कार्य करत असल्याने दिनकर शिंदे व त्यांच्या सहकार्याबाबत गेवराईकरांमध्ये मोठा विश्वास पाहायला मिळतो. गेवराई हे कलेचे माहेरघर असले तरी कलाविष्कार प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेवराई तालुका आणि बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळाली असल्याचे गौरवोद्गार डॉ दिपाताई क्षिरसागर यांनी काढले.
पुरस्कार प्राप्त ऍड कमलाकर देशमुख, सौ प्रीतीताई गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, सुभाष सुतार, डॉ रचना शेळके, धर्मराज करपे यांच्यासह बालग्राम परिवाराचे संतोष गर्जे यांनी कलाविष्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे यांनी तर सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी केले.
कार्यक्रमास सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, पत्रकार, बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here