Home क्रीडा ICC चा नवा पुरस्कार …..

ICC चा नवा पुरस्कार …..

4762
0

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCने क्रिकेटपटूंसाठी एक नवा पुरस्कार सुरू केला आहे.जानेवारी २०२१पासून ICCतर्फे दर महिन्याला एक नवीन पुरस्कार देण्यात येणार आहे. महिन्यातील सर्वोत्तम पुरूष व स्त्री क्रिकेटपटूचा सन्मान या पुरस्काराअंतर्गत करण्यात येणार आहे. “Player of the Month “असा पुरस्कार असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पुरस्कारासाठी चाहत्यांनाही नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंना मत देता येणार आहे.

असा ठरेल ” Winner “
ICCकडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातील. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातील. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी ICCच्या मतदान अकादमीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकारी असतील. ICCच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येणार आहे. विजेत्या खेळाडूंची नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर केली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here