Home क्रीडा के एल राहुल च्या धमाकेदार खेळीमुळे भारत हा हरता हरता जिंकला…

के एल राहुल च्या धमाकेदार खेळीमुळे भारत हा हरता हरता जिंकला…

254
0

भारतापुढे विजयासाठी १८९ धावांचे आव्हान होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे 16 रन्स वर 3 बाद झाले होते . पण त्यावेळी लोकेश राहुल संघासाठी धावून आला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताला हा सामना जिंकता आला .

भारताची ३ बाद १६ अशी वाईट अवस्था असताना लोकेश राहुल खेळायला आला आणि त्याच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने अखेर हा सामना जिंकला. भारताला एकामागून एक धक्के बसत होते आणि भारत हा सामना हरणार , असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण राहुलच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताला हा हरणार सामना जिंकता आला. लोकेश राहुलने यावेळी 6 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७५ धावांची दणदणीत खेळी केली . राहुलच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना पाच विकेट्स राखून जिंकला.

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे १८९ धावांचे आव्हान होते. हे आव्हान कमी वाटत होते. पण हे आव्हान थिटे दिसत असले तरी भारताला सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसायला लागले. भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. संघात पुनरागमन करणारा इशान किशन हा तीन धावा वर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर या सामन्यात स्टार्कचा जलवा पाहायला मिळाला. कारण स्टार्कने एकामागून एक तीन विकेट्स काढत भारताला वाईट अवस्थेत आणले . पाचव्या षटकात तर स्टार्कने कोहलीला पळता भूई थोडी करून सोडले होते. कारण स्टार्कच्या गोलंदाजीचा कोणताच तोडगा यावेळी कोहलीकडे नसल्याचे पाहायला मिळाले. स्टार्कने कोहलीला पायचीत पकडले आणि भारताला दुसरा धक्का बसला. कोहलीला यावेळी फक्त चार धावा करता आल्या. कोहली बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो सूर्यकुमार यादव.

कोहली बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो सूर्यकुमार यादव. सूर्याचे हे घरचे मैदान होते. पण स्टार्कने आपल्या पहिल्याच चेंडूवर सूर्याला पायचीत पकडले आणि जोरदार अपील केली. पण पंचांनी यावेळी सूर्याला नाबाद ठरवले होते. पण ऑस्ट्रेलियाने यावेळी डीआरएस घेतला आणि त्यामध्ये रिप्ले पाहून सूर्या बाद असल्याचा निर्णय घेतला. एकामागून एक विकेट्स पडत असताना शुभमन गिल हा खेळपट्टीवर ठाम होता. पण स्टार्कने गिलला बाद केले आणि भारताला मोठा धक्का दिला. कारण गिलने २० धावा केल्या होत्या आणि तो भारताचा डाव सावरत होता. पण स्टार्कने त्याला बाद केले आणि भारताला चौथा धक्का बसला.

भारताची ४ बाद ३९ अशी अवस्था असताना राहुलला काही काळ कर्णधार हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. पण पंड्या यावेळी २५ धावा करू शकला. पंड्या बाद झाल्यावर रवींद्र जडेजा हा फलंदाजीला आला आणि त्याने राहुलला चांगली साथ दिली. राहुलने यावेळी अर्धशतक झळकावले आणि भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तत्पूर्वी मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या आणि त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला १८८ धावांत ऑल आऊट करता आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here