Home क्राइम अर्णब गोस्वामी विषयी धक्कादायक खुलासा…!

अर्णब गोस्वामी विषयी धक्कादायक खुलासा…!

80
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिनीच्या टीआरपी घोटाळ्या संबंधित नवीन माहिती समोर आली आहे.रिपब्लिकचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचेमाजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शुक्रवारी(१५ जाने.)समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही चॅट खरी असून हा एक महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता,सीओओ रोमिल रामगढिया तसेच रिपब्लिक टीव्हीचे विकास खानचंदानी यांच्यावर ३,६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यामधील व्हॉट्सअॅप संभाषण पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते. हेच संभाषण शुक्रवारी(१५ जाने.)समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

दासगुप्ता यांनी बार्कची गोपनीय माहिती व्हॉटसअॅप आणि ई-मेलद्वारे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या बदल्यात केंद्र सरकारमध्ये माध्यम सल्लागार होण्यासाठी गोस्वामी यांच्याकडून मदत मागितली. एका संभाषणात दासगुप्ता यांनी ‘एनबीएला जॅम केले आहे, हे मी खात्रीने सांगतो. तुम्ही काही सांगण्याआधीच मी तुम्हाला मदत केली आहे. बाकी सर्व वाहिन्यांना मी जॅम केले आहे,’ असे म्हटल्याचे या संभाषणांच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते.

दरम्यान,ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी देखील हे स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की,’बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे हे स्क्रीनशॉट आहेत. त्याद्वारे अनेक कारस्थाने, सत्तावर्तुळाशी अभूतपूर्व लागेबांधे आणि त्यांच्या हातातील प्रसारमाध्यमाचा आणि सत्तेच्या स्थानाचा कमालीचा गैरवापर उघड होत आहे. कायद्याचे राज्य असलेल्या कोणत्याही देशात अशी व्यक्ती दीर्घकाळासाठी तुरुंगात जाईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here