Home महाराष्ट्र कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही – अनिल देशमुख

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही – अनिल देशमुख

35
0

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई : “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर दिली आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here