Home अर्थकारण भारतीय शेअर बाजारात घसरण;सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरून ५९,०३४ वर उघडला

भारतीय शेअर बाजारात घसरण;सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरून ५९,०३४ वर उघडला

231
0

आज देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल प्री-ओपनिंगमध्ये थोडीशी डळमळीत झाली होती, परंतु बाजार उघडण्याच्या वेळी निफ्टी हिरव्या चिन्हावर परतला.
सेन्सेक्सची घसरणही कमी झाली आणि तो १०० अंकांच्या घसरणीनंतर उघडला. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन बाजारातील गोंधळाचा भारतीय शेअर बाजारावर सध्या फारसा नकारात्मक परिणाम होत नाहीये.बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स आज १०१.३६ अंकांनी किंवा ०.१७ टक्क्यांनी घसरल्यानंतर ५९,०३४ वर उघडला. दुसरीकडे, NSE चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ९ अंकांच्या किंचित वाढीनंतर१७,४२१.९० वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती :
सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ३ शेअर्स घसरणीसह व्यवसाय करत आहे आणि २७ शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीच्या ५० पैकी ४७ शेअर्स तेजीत असून ३ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
टेक महिंद्रा आज सेन्सेक्स शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह व्यवहार करत आहे. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स तेजीत आहेत.याशिवाय बजाज फायनान्स, एचडीएफसी, एचयूएल, एसबीआय, टीसीएस, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्सही जोरदार व्यवहार करत आहेत. आयटीसी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्येही वाढ झाली आहे.
‘या’ शेअर्समध्ये घसरण :एशियन पेंट्स, नेस्ले, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एनटीपीसी, टायटन हे शेअर घसरताना दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here