Home औरंगाबाद जुन्या योजनेचं आज नव्याने ‘उद्धघाटन’…!

जुन्या योजनेचं आज नव्याने ‘उद्धघाटन’…!

449
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : शहराचा पाणीप्रश्न नेहमीसाठी सुटावा यासाठी 2019 साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1680 कोटीची महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. तसेच रस्त्यासाठी शंभर कोटी रुपये व दुसऱ्या टप्प्यात आणखी शंभर कोटी रुपये देण्याचे मंजूर केले होते. यासोबतच प्राणी संग्रहालय, हिंदु ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीवन यासह विविध प्रकारच्या कामे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले होते. त्याच कामाचे मनपा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भूमीपूजन करत असल्याचा आरोप भाजप ने पत्रकार परिषदेत केला आहे.

त्यावेळी पाणी पुरवठा योजनेसाठी सर्व खर्च राज्य सरकारने करावा असे ठरले होते. महापालिकेवर ओझे टाकले नाही, पण या महाआघाडी सरकारने महापालिकेने तीन वर्षात 631 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी द्यावे असे हमीपत्र लिहून घेतले आहे. अगोदरच महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. आणखी ओझे टाकले तर या योजनेचे पुन्हा समांतर योजनेसारखे वाटोळे होईल. महापालिकेवर ओझे न टाकता ही योजना राज्य सरकारने पूर्ण करावी अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. भूमीपूजन कार्यक्रमात फक्त दोनशे जणांना आमंत्रित करण्यात आले याबद्दल त्यांनी टिका केली. आमदार म्हणून मलाही अजून निमंत्रण मिळाले नाही असे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजने सोबतच या सर्व विकास कामाचे श्रेय भाजपाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे परंतु त्यांना ऐकही विकास काम करता आले नाही. उलड पक्षी जे भाजप सरकारने मंजूर केलेले विकास कामे आहेत त्यांना स्थगती दिली होती. व तेच कामे आता मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनते मध्ये श्रेय मीळावा म्हणून भूमीपूजन करत आहेत. परंतु जनतेला माहिती आहे की हे सर्व विकास कामे आम्ही मंजूर केलेले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना भाजप नेते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण वर्षभरात जनतेसाठी एकतरी काम केले आहे का ते दाखवावे असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खा.डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here