Home अर्थकारण अमेरिकेतला १०० फुट रुंद बंधारा फुटला!

अमेरिकेतला १०० फुट रुंद बंधारा फुटला!

211
0

अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाजारो नदीवर बांधण्यात आलेले बंधारा फुटल्याने आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्यात बुडाला आहे.त्यामुळे हजारो लोकांना राहते घर सोडून स्थलांतर करावे लागले आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हवामान केंद्राने इशारा दिल्यानंतर सेंट्रल कोस्टच्या मॉन्टेरी काउंटीमध्ये ८.५०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यातील पजारो नदीवरील बंधारा फुटल्याने १.७०० लोक पुरात अडकले होते.

प्रशासनाने सांगितले की, पजारो नदीवर बांधण्यात आलेला बंधारा हा सुमारे १०० फूट रुंद होता. शनिवारी पहाटे मुसळधार पावसाने हा बंधारा फुटल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले आणि परिस्थिती बिकट झाली. मात्र, प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून परिस्थिती हाताळण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे उत्तर कॅलिफोर्नियाला भूस्खलनाचाही धोका निर्माण झाला आहे. अनेक रस्ते बंद झाले आहेत, झाडांची पडझड सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. हवामान तज्ञांनी इशारा दिला आहे की आठवड्याच्या मध्यापर्यंत सिएरा आणि उंचीच्या भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

उत्तर कॅलिफोर्नियामधील या विनाशकारी पुराचे वर्णन खूप मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे. येथील परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी पुढचे अनेक महिने लागतील, असा अंदाज अधिकाऱ्यांचा व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासनाने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सर्वाधिक बाधित भाग असलेल्या पजारोला भेट देण्यास सांगितले आहे.

अहवालानुसार, डायव्हिंग पथक, कॅलिफोर्निया फॉरेस्ट्री आणि फायर प्रोटेक्शन विभागाच्या स्विफ्ट वॉटर पथकाच्या मदतीने हाय-वॉटर व्हेईकल्सचा वापर करून बचाव कार्य जोरात सुरू आहे. नॅशनल गार्डचे कर्मचारी मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत.१५० हून अधिक लोकांना काउंटी आश्रयस्थानांमध्ये ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here