Home मनोरंजन आंतरराष्ट्रीय नावांमध्ये आता आलीया भट्टचेही नाव समाविष्ट झाले आहे.

आंतरराष्ट्रीय नावांमध्ये आता आलीया भट्टचेही नाव समाविष्ट झाले आहे.

209
0

प्रभावशाली आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत आलिया भट्टचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आलीयाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता, आता यानंतर आलीयाचा अजुन एक सन्मान झाला आहे. 2023 च्या प्रभावशाली आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत तिचे नाव आहेत.या यादीमध्ये शो-बिझनेसच्या विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश आहे ज्यांनी अलीकडेच उत्कृष्ट काम केले आहे.
एसएस राजामौली यांच्या आरआरआर आणि संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये केलेल्या कामासाठी आलियाचं प्रचंड कौतुक होत आहे. यावर आलीया म्हणाली , “एक चित्रपट नेहमीच असतो जो भाषेच्या पलीकडे जातो आणि लोकांच्या हृदयात आपली छाप सोडतो.”
आलिया नेहमी आपल्या अभिन्यातून लोकांनाचा मनामध्ये घर करत असते. प्रत्येक सेनामा मधूनती तिची वेगळी छाप सोडत असते. त्यामुळ एका मागे एक पुरस्कार मिळत आहेत. या आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत HBO हिट हाउस ऑफ द ड्रॅगन – मिलि अल्कॉक, एमिली केरी, ऑलिव्हिया कुक, एम्मा डी’आर्सी, सोनोया मिझुनो या महिलांचाही समावेश आहे. या यादीत स्पॅनिश गायिका रोसालियाचाही समावेश आहे.
गेल्या वर्षीही ती कॉमेडी-थ्रिलर डार्लिंग्समध्ये दिसली होती. गंगूबाई काठियावाडीमध्ये तिने मुंबईतील कामाठीपुरा भागातील वेश्यालयाच्या म्होरक्या स्त्रीची भूमिका केली होती. RRR मध्ये तिची जोडी राम चरण सोबत होती आणि चित्रपटात तिची छोटी भूमिका होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here