Home औरंगाबाद मॉन्टी सिंगच्या मारेकऱ्याला पुण्यातून अटक

मॉन्टी सिंगच्या मारेकऱ्याला पुण्यातून अटक

17
0

आरोपी एका राजकीय पक्षाचा प्रदेशउपाध्यक्ष

मराठवाडा साथी

औरंगाबाद : गेल्या चार-पाच महिन्यापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू असलेल्या मित्रानेच मॉन्टी सिंगची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी कपिल रापते उर्फ राजे याला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अटक केली. कपिल हा राष्ट्रीय जनता दलाचा प्रदेश उपाध्यक्ष असून त्याला परभणी येथून तडीपार करण्यात आलेले आहे.

मिटमिटा येथील पिस होम सोसायटीतील एका अपार्टमेंटमध्ये २१ आॅक्टोबर रोजी एका राजकीय संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या मंटूश कुमार सिंग अनिल कुमार सिंग (३०, मुळ रा. कुंज, ओहारी, ता. नवादा, बिहार) याची चाकूने भोसकून हत्या केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून कपिल रापते हा फरार झाला होता. दरम्यान, छावणी पोलिस व गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. तब्बल सहा दिवसानंतर दौंड येथून कपिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. मॉन्टी सिंगच्या मोबाईलमध्ये कपिलसोबतचे शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. तेव्हापासून पोलिस कपिलचा शोध घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here