Home व्यवसाय रेपो दरातील वाढ सामान्य जनतेची चिंता

रेपो दरातील वाढ सामान्य जनतेची चिंता

231
0

महागाईपासून सुटका होणार असे आपल्याला वाटत होते परंतु येत्या एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा परिणाम सर्वानाच होणार आहेत.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आर बीआय ने रेपो दरात  0.25 टक्क्यांची वाढ केली आणि येत्या एप्रिल महिन्यात या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहेत.
RBI ने गेल्या वर्षभरात व्याजदर वाढीचा धडाका लावला आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात पुन्हा रेपो दरात 25 बीपीएस वाढीची शक्यता आहे. गेल्या एक वर्षापासून भडकलेले रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे युद्धात सहभाग घेतल्याने बाजारावर अनिश्चिततेचे ढग आहेत. या सर्वांचा परिणाम महागाई वाढण्यावर होत आहे.येत्या काही दिवसात 25 आधार अंकांची वाढ होईल. एक्यूइट रेटिंग्सने केलेल्या दाव्यानुसार, एप्रिल 2023 मध्ये आरबीआय रेपो दरात 25 बीपीएसची वाढ करु शकते.
या धोरणाचा सर्वसामान्यांना मोठा परिणाम होईल. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कसरत आणि वाढता ई एम आय या कात्रीत सर्वसामान्य नागरिक अडकणार आहे. यापूर्वी ज्या बँका 6.5 टक्क्यांनी कर्ज देत होत्या. त्यांचे व्याजदर आता 8.85 टक्के होईल. सध्या कर्जदारांवर प्रति लाखांमागे 825 रुपयांच्या हप्त्याचा बोजा पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here