Home देश-विदेश व्यक्तीची शेवटची इच्छा :अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे

व्यक्तीची शेवटची इच्छा :अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे

400
0

नवी दिल्ली: प्रत्येक व्यक्तीच्या काही आशा, आकांक्षा, इच्छा असतात. काहींना आपल्या जीवंतपणीच इच्छा पूर्ण करायच्या असतात तर काहींना मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत काय केलं जावं याविषयी इच्छा असतात. काही लोकांच्या अनेक विचित्र इच्छा असतात. ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही . याविषयीच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीची अशी इच्छा समोर आली, जी कुटुंबातील सदस्य पूर्ण करू शकत नसतील तर? असाच काहीसा प्रकार ब्रिटनमधील एका कुटुंबासोबत घडला.डेली स्टारच्या वृत्तानुसार, इयान ऍटकिन्सन नावाच्या व्यक्तीने लोकांच्या शेवटच्या इच्छेवर संशोधन केले, त्यानंतर त्याला एका ब्रिटीश व्यक्तीच्या इच्छेबद्दल सांगण्यात आले ज्याची इच्छा होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे तुकडे करून कुटुंबाला खायला द्यावे. नरभक्षक ब्रिटनमध्ये कायदयाने गुन्हा असल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र व्यक्तीच्या इच्छेने सर्वांनाच धक्का बसला आहे .
आपल्या देशात, लोकांना मरण्याबद्दल बोलणे आवडत नाही, परंतु काही धाडसी लोक आहेत, जे जिवंत असताना त्यांची शेवटची इच्छा व्यक्त करतात. त्याचे अंतिम संस्कार कसे करायचे ते आनंदाने सांगतात. मात्र सध्या समोरआलेल्या या विचित्र प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्या व्यक्तीने सांगितले होते की, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे मांस कुटुंबातील सदस्यांनी खावे.दरम्यान, या व्यक्तीची इच्छा जरी ब्रिटनमध्ये पूर्ण होऊ शकली नाही, परंतु जर त्याचा जन्म सेनेमा नावाच्या जमातीत झाला असता तर ही इच्छा पूर्ण झाली असती. वास्तविक, या जमातीचे लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाला पाने आणि इतर वस्तूंनी झाकतात. ३०-४० दिवसांनी ते त्याला परत आणतात आणि उरलेला मृतदेह जाळतात. हे लोक सूप बनवतात आणि शरीर जाळल्यानंतर उरलेली राख पितात. या प्रथेचे येथे परंपरेने पालन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here