Home इतर स्मशान घाटाचे छत कोसळून २५ जणांचा मृत्यू…!

स्मशान घाटाचे छत कोसळून २५ जणांचा मृत्यू…!

58
0

मराठवाडा साथी न्यूजने

गाझियाबाद : ज्या स्मशानात मृतांना जाळले जाते त्याच स्मशानभूमीत रविवारी(३ जाने.)संध्याकाळी चक्क २५ जणांना जीवित समाधी मिळाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे ३-४ महिन्यांअगोदरच हे छत बांधण्यात आले होते,यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या घटनेला नेमके जबादार कोण?असा प्रश्न नबागरिकांकडून उपस्थित होत आहे.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये घडली आहे.डिफेन्स कॉलनी परिसरातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या परिवारातील मंडळी स्माशानात जमली होती. अत्यंसंस्काराचा विधी सुरु असतानाच अचानक त्यांच्या अंगावर स्माशानाचे छत कोसळले. घटनेदरम्यान स्मशानभूमीच्या कॉरिडॉरचे छत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुरादनगर महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी निहारिका सिंह, कनिष्ठ अभियंता चंद्रपाल आणि पर्यवेक्षक आशिष यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कंत्राटदार अजय त्यागी अद्याप फरार आहे. मंडलयुक्त अनिता सी मेश्राम यांच्या सूचनेवरून दोषी गुन्हेगारी, भ्रष्टाचार,निष्काळजीपणासह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.NDRF ने या संबंधित अधिक माहिती देत धक्कादायक खुलासा केला आहे. या स्मशानाचे छत महिन्यांपूर्वी बांधण्यात आले होते.मात्र,छत बांधण्याकरीता वापरण्यात आलेले सामान अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हि घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here