Home क्राइम छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील बॅनर फाडले….

छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील बॅनर फाडले….

111
0


मराठवाडा साथी न्यूज
सातारा : सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी ९ जानेवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. उदयनराजे समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. पोलिसांच्या ही बाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here