Home अपघात बातमी H3N2 बाधित रुग्णाचा नगरमध्ये मृत्यू, महाराष्ट्रातला पहिला बळी

H3N2 बाधित रुग्णाचा नगरमध्ये मृत्यू, महाराष्ट्रातला पहिला बळी

196
0

अहमदनगर : कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका मात्र अजूनही कायम आहे. आता कोरोनापाठोपाठ H3N2 व्हायरसने डोक वर काढलं आहे. देशात नव्याने आढळलेल्या H3N2 व्हायरससह कोरोनाची लागण झालेल्या अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहे.

दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचे नमुने तपासणीसााठी पाठवण्यात आले आहे. हा तरुण बाहेर फिरायला गेला होता. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता H3N2 बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरागे यांनी याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात पहिल्यादांचा H3N2 मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

दरम्यान, पुण्यात ‘H3N2 चे २२ रुग्ण आढळ्यामुळे खळबळ उडाली आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे 19ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे, त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशासह इतर शहरात इन्फल्युन्झाचा (H3N2) संसर्ग वाढत आहे. नवी मुंबई शहरात ही महापालिकेच्या बाह्यरुग्णांत ५० टक्के रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे आढळत आहेत. यामध्ये ५ वर्षाखालील लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात ही इन्फल्युन्झा संशयित रुग्ण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वातावरणातील उष्ण-दमट हवामान आणि वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. वाशीतील महापालिका रुग्णालयातील बाह्य रुग्णांची संख्या १४०० वर गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here