Home औरंगाबाद पदवीधर निवडणुक भाजपच्या पायाखालची वाळू सरकली…!

पदवीधर निवडणुक भाजपच्या पायाखालची वाळू सरकली…!

485
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत थेट लढत ही भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिष चव्हाण यांच्यात होत आहे. जरी रिंगणात ३५ उमेदवार असले तरी खरी लढत ही सतिष चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यामध्ये होत आहे. पण भाजपचा उमेदवार कच्चा असल्याने तो लढत देऊ शकेल की नाही, याबाबत मतदानाच्या आदल्या दिवशी शंका निर्माण झाल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून सतिष चव्हाणांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आज सकाळपासून पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियातील प्रचारावर बंदी निवडणुक आयोगाने आणलेली नाही. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून रात्रीपासून सतिष चव्हाणांवर आरोप करणाऱ्या पोस्ट भाजपने व्हायरल करायला सुरवात केली आहे. त्यामध्ये जे पोस्टर टाकले आहेत, त्यातुन तरी मतदार आपल्याकडे वळेल, अशी त्यांची आपेक्षा आहे. त्यासाठीच निकोप लोकशाहीने निवडणुक लढविण्याच्याऐवजी असा गैरकायदेशीर प्रचार चालविला आहे.

दरम्यान,’औरंगाबाद पदवीधर निवडणुकीचे’ सकाळीच मतदान सुरु झाले असले तरी दुपारपर्यंत फक्त ७ टक्केच मतदान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here