Home Uncategorized सज्ज व्हा! बूस्ट परीक्षा 18 डिसेंबरला, बंसल क्लासेस आयोजित बूस्ट परीक्षेस एक...

सज्ज व्हा! बूस्ट परीक्षा 18 डिसेंबरला, बंसल क्लासेस आयोजित बूस्ट परीक्षेस एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावनोंदणी!

13303
0


औरंगाबाद : राष्ट्रविख्यात बंसल क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांसाठी आयोजित बूस्ट परीक्षेसाठी 1 लाख विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी पूर्ण केली आहे. देशभरात लाखो डॉक्टर्स, इंजिनिअर्स घडविणारे बंसल क्लासेस विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. कारण गेल्या 40 वर्षांपासून बंसल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. बंसल क्लासेसचा भाग असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असणार यात शंकाच नाही परंतू इतर विद्यार्थ्यांचे भवितव्यही उज्वल व्हावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी बंसल क्लासेस नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणजे बंसल ओपन अर्पार्च्युनिटी स्कॉलरशिप टेस्ट म्हणजेच बूस्ट. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास उंचावण्यासाठी बंसल क्लासेसने बूस्‍ट परीक्षेचे दि. 18 डिसेंबर 2022, रविवार रोजी सकाळी 11 ते दु. 1 वाजेपर्यंत आयोजन केले आहे. या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना 1.50 करोड रूपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी 11 लाख रूपयांची रोख बक्षीसे असून 100 टक्के स्कॉलरशिप मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बूस्टसाठी नाव नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी परीक्षा सेंटरवर नाव नोंदणी करता येईल. तसेच खालील क्यूआर काेड स्कॅन करुनही नोंदणी करता येईल.


बंसल क्लासेसच्या विविध शाखांवर, विविध शाळांवर आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी आता पर्यंत तब्बल 1 लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खाजगी कोचिंग क्लासेसने आयोजित केलेल्या परीक्षेसाठी एवढ्या मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. बूस्ट परीक्षेसाठी 1 लाख विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे आणि अजूनही नाव नोंदणीची प्रक्रिया चालूच आहे. यावरून विद्यार्थी आणि पालकांचा बंसल क्लासेसवर असलेला अतूट विश्वास दिसून येतो जो की, बंसल क्लासेसने गेल्या 40 वर्षांमध्ये लाखो डॉक्टर्स, इंजिनिअर्स घडवून कमावला आहे. बंसल क्लासेसचे मुख्य प्रवर्तक मा.श्री.चंदुलालजी बियाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली बंसल क्लासेसचे 1 हजार 600 पेक्षा जास्त शिक्षक, अधिकारी व कर्मचारी बूस्ट परीक्षेची यशस्वी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आयोजित बूस्ट परिक्षा ही ऑफलाईन मोड मध्ये घेण्यात येणार असून दहावी वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र आहेत. महाराष्ट्रामध्ये बंसल क्लासेसच्या लातूर, अंबाजोगाई, अहमदनगर, गंगाखेड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, उद्गीर, केज, माजलगाव, नाशिक, बीड, गेवराई, अकोला, पंढरपूर, परळी, उमरगा, पुणे, सोलापूर, बजाजनगर वाळूज, औरंगाबाद, जालना या सर्व ठिकाणी शाखा आहेत. या सर्व शाखा आणि या सर्व ठिकानी असणाऱ्या अनेक शाळांसह एकूण 250 पेक्षा जास्त ठिकाणी बूस्ट परीक्षेचे आयोजन केले आहे. बूस्ट परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सूवर्ण संधी असून या संधीचा लाभ घ्यावा आणि स्कॉलरशिपसह विविध बक्षिसे जिंकावे असे आवाहन बंसल क्लासेसचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक श्री. चंदुलालजी बियाणी यांनी केले आहे.


राजस्थान कोटा येथे बंसल क्लासेस मार्फत मोफत शैक्षणिक सुविधा!
मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बंसल क्लासेसने आणखी एक मोठा निर्णय विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी घेतला आहे. NEET, IIT-JEE ची तयारी करणाऱ्या 120 विद्यार्थ्यांना बंसल क्लासेस कोटा, राजस्थान येथे मोफत शैक्षणिक सुविधा देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदरील परीक्षा ही 8 जानेवारी 2023, रविवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होईल.
ज्या विद्यार्थ्यांना राजस्थान कोटा येथे मोफत शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणे काही कारणास्तव शक्य नसेल,अशा विद्यार्थ्यांना बंसल क्लासेसच्या नांदेड व लातूर शाखेत मोफत शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणीची शेवटी तारीख ही दि. 7 जानेवारी 2023 ही आहे. खाली दिलेल्‍या QR कोड स्कॅन करून विद्यार्थी परीक्षेसाठी नाव नोंदणी करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here