Home मनोरंजन ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची पंचवीशी! राज-सिमरनच्या प्रेमकहाणीचा रेकॉर्डब्रेक प्रवास

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची पंचवीशी! राज-सिमरनच्या प्रेमकहाणीचा रेकॉर्डब्रेक प्रवास

6
0

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

मुंबई : पंजाबमधील सरोसो (मोहरी)च्या शेतांपासून ते स्वित्झर्लंडच्या सुंदर ठिकाणी दिग्दर्शित करण्यात आलेला, आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) 25 वर्षांचा झाला. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांचा हा चित्रपट हा त्या चित्रपटांपैकी एक आहे, जो चाहते कधीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतात. 25 वर्षापूर्वी शाहरूख-काजोलच्या अदाकारीने रंगलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here