Home मनोरंजन रामचरणसोबत झळकणार जान्हवी कपूर

रामचरणसोबत झळकणार जान्हवी कपूर

218
0

२३ मार्च रोजी शूटिंग सुरू होणार

‘नाटू-नाटू’साठी ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर ज्युनिअर एनटीआरने त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. ज्युनियर एनटीआर 23 मार्चपासून ‘एनटीआर 30’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत येत्या २३ मार्च रोजी चित्रपटाची मुहूर्त पूजा हैदराबादमध्ये होणार असल्याची माहिती दिली आहे.ही बातमी शेअर करताना, चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिले – स्टॉम अलर्ट #NTR30 मुहूर्त २३ मार्च रोजी! कोराताला सिवा दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे.या चित्रपटाचे मोशन पोस्टर गेल्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाले होते.एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ५ एप्रिल२०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती एनटीआर आर्ट्स प्रोडक्शन कंपनीचे हरी कृष्ण के आणि युवा सुंधा आर्ट्सचे सुधाकर मिक्किलीनेनी करत आहेत.चित्रपटाला अनिरुद्ध रविचंद्रन यांचे संगीत आहे तर आर रत्नावेलू कॅमेरा दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.ज्युनियर एनटीआरसोबत काम करणे हे माझे स्वप्न आहे, खरे सांगायचे तर मी दररोज त्याच्यासोबत काम करायचे आहे. मला आता जी संधी मिळत आहे, ते माझ्या प्रार्थनेचे फळ आहे. – जान्हवी . या चित्रपटातून जान्हवी कपूर टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात एनटीआरसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल जान्हवी म्हणाली – मी फक्त दिवस मोजत आहे. मी रोज डायरेक्टरला मेसेज करते.ज्युनियर एनटीआरसोबत काम करायला मिळणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. मी नेहमीच सकारात्मक मानसिकतेने चित्रपटांमध्ये काम केले आहे. जान्हवी पुढे म्हणाली- मी अलीकडेच पुन्हा एकदा आरआरआर पाहिला. NTR जवळ अद्भूत करिश्मा आहे. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here