Home अपघात बातमी रस्त्यावरील खोदकामामुळे गॅस गळती, किचनमध्ये गॅस शिरल्याने घर उद्धवस्त

रस्त्यावरील खोदकामामुळे गॅस गळती, किचनमध्ये गॅस शिरल्याने घर उद्धवस्त

219
0

कर्नाटकातील बंगळुरू येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एचएसआर लेआउटच्या सेक्टर ७ मधील दोन घरांमध्ये अचानक बॉम्बसारखा गॅसचा स्फोट झाल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटात दोन घरं उद्ध्वस्त झाली असून, दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट गेल गॅस पाइपलाइनमध्ये (Gas Authority of India Limited) झाले आहेत. रस्त्यावरील पाणीपुरवठा मंडळाकडून गटार खोदकामामुळे पाईपलाईन खराब झाली होती. त्यामुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, HSR लेआउटच्या सातव्या टप्प्यातील गटार खोदकाम सुरू असताना जमिनीखालील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या पाइपलाइनला मजुराची कुदळ लागली, त्यामुळे पाइपलाइन खराब झाली. धक्कादायक बाब म्हणजे मजुरांनी पाइपलाइनचा गॅस गळती होत असलेला भाग कुणालाही न सांगता मातीने झाकला, त्यामुळे पाइपलाइनमधून गॅस गळती होत राहिली आणि गॅस शेजारच्या घरांमध्येही पसरला.

गॅसगळती झाली त्यावेळी शेजारच्या घरांमध्ये महिला किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. त्यावेळी गॅसगळती झालेल्या गॅसमुळे किचनमध्ये बॉम्बसारखा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला २५ टक्के भाजली आहे, तर आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरांमध्ये स्फोट झाल्याची ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये घरामध्ये मोठा स्फोट झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here