Home छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’कडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु

छत्रपती संभाजीनगरात ‘ईडी’कडून छापेमारी; नऊ ठिकाणी कारवाई सुरु

954
0

छत्रपती संभाजीनगर : शहरात ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत संभाजीनगरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यात आज सकाळपासून ईडीने छापमारी सुरू केलीय. सकाळच्या विमानाने जवळपास १५ अधिकाऱ्यांचे पथक संभाजीनगरात दाखल झाले.आणि कंत्राटदार, त्याच्याशी संबंधित एकूण ९ ठिकाणांवर छापेमारी सुरु केली. कासारी बाजार,नाज गल्ली, आकाशवाणी, सिडको, समर्थनगर, जवाहर नगर पोलीस स्टेशन जवळ घर आणि कार्यालयावर ही छापमारी सुरु आहे. याबाबत काही कागदपत्र ईडीने आधीच महापालिकेकडून मागवून घेतली होती त्या पुन्हा काही कागदपत्र आज जप्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी शहर गुन्हे शाखेने कारवाई करत सिटी चौक पोलिस ठाण्यात यापूर्वीच १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच महापालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा १९ जणांवर आरोप आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात येत आहे. ४० हजार घरांच्या जवळपास ४ हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तक्रार केल्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. आकाशवाणी परिसर भागातील कंत्राटदार संबंधित या क्लिनिकवर ईडीचे लोक आले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण !
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी ४० हजार घरांसाठी चार हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढण्यात आली होती. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी देखील निविदा भरली होती. मात्र यावेळी भरण्यात आलेल्या निविदा एकाच आयपीवरुन भरली असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here