Home कृषी भाव घसरल्याने शेतकऱ्यांकडून कोथिंबीर, मेथीचे मोफत वाटप

भाव घसरल्याने शेतकऱ्यांकडून कोथिंबीर, मेथीचे मोफत वाटप

590
0

नाशिक : कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच नाशिक बाजार समितीत लिलावात शुक्रवारी कोथिंबीर आणि मेथीला शेकडा १०० रुपयाचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी हतबल होऊन लिलावातून भाजी काढून घेत दिंडोरी नाका येथे अक्षरक्ष: फुकट नागरिकांना भाजीचे वाटप केले.नाशिक बाजार समितीत लिलावामध्ये पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी व कोथिंबीर या पालेभाज्यांना प्रतिशेकडा शंभर रुपयाचा भाव मिळाला. म्हणजेच प्रतिजोडी एक रुपया भाव मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिंडोरी नाका परिसरात नागरिकांना भाजीचे फुकट वाटप केले.याबाबत शेतकरी संतोष बाबूराव बरकडे (ता. दिंडोरी) व भूषण सुभाष आथरे (रा. निफाड) म्हणाले, की सदरचे पीक येण्यासाठी त्यांना 25 हजार रुपये खर्च आलेला असताना आता मात्र लिलावात त्याना फक्त शंभर रुपये हातात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here