Home समाज बाणा मराठी अस्मितेचा

बाणा मराठी अस्मितेचा

128
0

मानवतेची आणि माणूसकीची दाखवून देई भावना
जिच्यामधूनी उमटूनी येती माझ्या महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या पाऊलखुणा

माय मराठी आहे आमुची भाषेची जननी
जिच्यामधूनी फुलून येती सुख-दुःखाची विचार शैली

जिच्या जोरावर प्रवास होतो जीवनाचा खरा
शब्द गंध्धे तिची निराळी घेई कवेत आकाशा

शब्द निराळे, स्वर निराळे या मराठी भाषेचे
लाखोंच्या संख्येने जोडली ती हृदयस्पर्शी अंजिक्य मनें

समतेचे अन् एकतेचे जिच्यातून मिळती धडे
जिच्या हृदयातून वाहती प्रेममय आपुलकीचे झरे

सत्य आणि अहिंसेचा जिने दाखविला सदमार्ग
जिच्यामुळे मिळे आम्हा दिर्घ मराठी असण्याचा स्वाभिमान

जिच्यामधूनी रेखाटली जातात नवस्वप्ने भवितव्याची
जिच्या मुळे ओळख मिळे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची

या मराठी भाषेविषयी मनात राहो स्फूर्ती विश्वातही व्हावा
तिचा नावलौकिक आणि पसरावी तिची अजरामर उल्लेखनीय कीर्ती

लिखित – गोरे सीमा किशनराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here