Home आरोग्य राऊत लीलावती रुग्णालयात दाखल …

राऊत लीलावती रुग्णालयात दाखल …

643
0

मराठवाडासाथी न्यूज
मुंबई :संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. २०१९ साली नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. पुन्हा एकदा उद्या (३ डिसेंबर) अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ मॅथ्यु, डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शतेखाली ही शस्त्रक्रिया होणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत शनिवारी लीलावती रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांची प्रथमिक तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी सर्जरी झाली होती. याच सर्जरीशी निगडीत शनिवारी त्यांच्या पुढील तपासण्या करण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ला नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांच्या छातीत वेदना होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here