Home महाराष्ट्र प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई. . .’ऑपरेशन लोटस’ ?

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई. . .’ऑपरेशन लोटस’ ?

515
0

रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई असू शकते ‘ऑपरेशन लोटस’ – छगन भुजबळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे ‘ऑपरेशन लोटस’ असू शकतं,’ अशी शंका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

‘केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांचा वापर कशासाठी केला जातो हे आता गुपित राहिलेलं नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना न आवडणारं बोललं की विरोधकांना त्रास देण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. मागे आम्ही जास्त बोललो तर आम्हाला त्रास दिला गेला. पवार साहेब बोलले तर त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली. कंगना राणावत सारख्या काही प्रकरणांत प्रताप सरनाईक आपल्या पक्षाच्या बाजूनं बोलत होते. त्यामुळं त्यांच्या विरोधातही असं काही होईल असं वाटतंच होतं. तसं ते होतंय. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी हे सगळं केलं जातंय,’ असं भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here