Home देश-विदेश चीनचे चांग ई-५ यान ४० वर्षानंतर आणणार चंद्रावरील खडक

चीनचे चांग ई-५ यान ४० वर्षानंतर आणणार चंद्रावरील खडक

515
0

चंद्राच्या पृष्ठभागावरून खडक, मातीचे नमुने आणण्यासाठी चीनने अंतराळात पाठवले चांग ई-५ यान

बीजिंग: चीनने आपला चांग ई-५ यान प्रक्षेपित केले आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरून तिथले खडक आणि अन्य अवशेष पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न चीन करणार आहे. चार दशकांत प्रथमच एखाद्या देशाने चंद्रावरून पृथ्वीवर खडक व अन्य अवशेष आणण्याचा प्रयत्न केला आहे.

या मोहिमेमुळे चंद्राचे वय, तिथली संसाधने आणि सौरयंत्रणेबद्दल माहिती मिळू शकणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून खाली दोन मीटरपर्यंत (सुमारे ७ फूट) खणून दोन किलो खडक आणि माती असे अवशेष पृथ्वीवर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, १९६० आणि ७०च्या दशकानंतर अमेरिका आणि रशियाच्या मोहिमांनंतर पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना चंद्रावरील अवशेषांचा अभ्यास करता येणार आहे. या मोहिमेला २३ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. चीनची ही चांद्रमोहीम यशस्वी झाल्यास चंद्राबाबत आणखी उलगडा होण्यास मदत होणार होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here