Home इतर अजूनही शोध सुरूच…!

अजूनही शोध सुरूच…!

216
0

मराठवाडा साथी न्यूज

जोधपूर : आर्मीच्या स्पेशल फोर्स चे कॅप्टन अंकित गुप्ता यांचा अजूनही शोध लागलेला नाही.राजस्थानात प्रशिक्षणादरम्यान ७ जाने.ला जोधपूरमधील ट्रेनिंग कँम्पमध्ये तख्त सागरात उडी मारल्यापासून अंकित बेपत्ता झाले होते.अंकित यांचा मार्कोस कमांडो आणि आर्मीच्या टीमकडून शोध घेतला जात आहे. मात्र,अजूनही त्यांच्या संदर्भात माहिती मिळालेली नाही.

नेमके काय घडले?
जोधपूरमधील तख्तसागर जलाशयात सेनादलाकडून प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अंकित गुप्ता आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून एक बोट जलाशयात फेकायची होती.त्याप्रमाणे त्यांनी ती फेकली त्यानंतर गुप्ता यांच्यासह इतर ३ जणांनी जलाशयात उड्या मारल्या. इतर तिघेजण पाण्यातून पोहत पोहत बोटीवर पोहोचले. मात्र,अंकित बोटीवर पोहोचले नाहीत. आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, एसडीआरफकडून कॅप्टन अंकित गुप्तांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान,कॅप्टन अंकित गुप्ता यांचा शोध लागला नसल्यामुळे रेस्क्यू टीमपुढे मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here