Home मुंबई उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला : किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला : किरीट सोमय्या

140
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए १२५ जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी ११० जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने ७४ जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्याने आणि राजदने ७५ जागांवर विजय मिळवला आहे,परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला १९ जागा मिळाल्या.सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJD ला विरोधी बाकांवरच बसावे लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

दरम्यान,बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढवलेल्या शिवसेनेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चिमटा काढला आहे. आपापल्या मतदारसंघात त्यांना एक टक्काही मते पडली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला, असा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here